कृष्ण गोजिरा लडीवाळा

Started by madhura, August 18, 2014, 08:34:02 AM

Previous topic - Next topic

madhura


कृष्ण गोजिरा लडीवाळा,


कृष्ण गोजिरा लडीवाळा,
पाय़ांत चांदिचा वाळा.
खोड्या करण्यात रममाण,
यशोदेचा, जिव की, प्राण.//१//




श्यामल,सुंदर, रुप मनोहर,
मोर, मुकुट,पितांबर सुंदर,
गुण करी, अन दुडुदुडु धावे,
लिला बघता, चित्त हारवे.


यशोदे आंगणी, नाचे मधुसुदन,
वाळा वाजे रुणुझुणु रुणुझुण
नाचे जग वंदन,नाचे आनंद घन,
नाचे कमलनयन, नाचे गोपी जिवन.


नाचे निल घन तन, नचें यदु नंदन.
नाचे सखे सवंगडी,नाचे सारे वृंदावन.
धन्य यशोदा, धन्य सारे वृंदावन.
गोजि~या, लडिवाळाच्या लिला पाहुन




-- Unknown

Oneovercola

तो खूप चांगला पोस्ट आहे. मी फक्त हे पोस्ट आणि मी rerunning शोधत होते. मी आवडत सामग्री भरपूर निश्चितपणे आहे.