तुम्हाला कविता करण्याचा छंद केव्हा पासून 

Started by Rahul Kumbhar, October 22, 2009, 11:35:02 PM

Previous topic - Next topic

Rahul Kumbhar

तुम्हाला कविता करण्याचा छंद केव्हा पासून आहे??
कोणत्या वयापासून तुम्ही कविता करता.. ??

santoshi.world


nirmala.


shonali
saru

लहानपणापासून मला शब्द सुचायचे. पण त्यांना कविता म्हणता येयील असे मला कधीच वाटायचे नाही. कारण स्वताला कमजोर समजायची मी कधी कविता रचू शकेल काय? म्हणून कधीच विचार केलेला नाही आणि मग अशीच मोठी होत गेली आणि मग कॉलेज मध्ये गेल्यानंतर माझ्या वर्गातील मुलगा ज्याच्यावर मी खूप जळायची. कारण तो खूप हुशार होता आणि मी इतकी नाही. पण जेव्हा कॉलेज च्या मक्झीनसाठी मला आमच्या सरांनी सांगितले कि कोणती तरी कविता लिहून दे म्हणून. पण मी विचार करायची सरांनी कोणाला सांगितले आहे जी काय नीट अभ्यास करू शकत नाही ती कविता काय रचणार? पण त्या मुलाने स्वताचा अग्रलेख बनवला आणि सरांना दिला. तेवा मला खूप वाईट वाटले कि तो मुलगा इतके छान विचार करून लिहू शकतो तर मी का नाही? आणि मग अशीच सगळ्याशी लपून लपून माझी पहिली कविता मी रचली एका छोट्याशा प्रसंगाला समोर मांडून ठेवले आणि माझी कविता पूर्ण झाली. ती हिंदीत आहे. माझी पहिली कविता, "दिल हि दिल में". सगळ्यांना खूप आश्चर्य झाले कि मी कविता रचली? सगळे मला बोलले खूप छान कविता आहे हि. आणि मग माझा उत्साह वाढला आणि मी कविता रचू लागली. एक अभिमान वाढला कि, "प्रयत्न केले तर सर्वकाही शक्य आहे." ,"केल्यानी होत आहे रे आधी केलेची पाहिजे." बस आणखी काय बोलू ? माणसाने स्वतावर आत्मविश्वास नेहमी ठेवावा. मग सगळे काही शक्य होते.  ज्यांनी मला हि संधी प्राप्त करून दिली कि मी काहीतरी विचार करू शकेन. THANX TO ALL YOU SUPPORT ME A LOT!!!!!
आणि असाच प्रतिसाद प्रत्येकांना देत राहा.
:) :) :) :) :) :)

हर्षद कुंभार

मला आधी कविता आवडायच्या पण कधी केल्या नव्हत्या.
पण जेव्हा job ला लागलो तेव्हा पासून सुचू लागल्या ,
त्याला पण एक खास कारण आहे. मी ऑफिस आणि घर हेय travelling
S .T .  ने करतो तेव्हा बस मध्ये मला १.३० तास travelling असायचे.
या वेळेत जे सुचायचे ते कविते मध्ये लिहित गेलो.

Shyam

Mitrano... mee swatha kavita karat nahi... pan kavita wachayala ani sangraha karnyacha mala chand aahe... vishesh manje kavitetun samorchya Vyaktila olkhnyacha prayatna karto mee...
ankhin ek ....tumha sarwanchya kavita khupch chann asatat...
Thanks ani tumhala manapsun shubhecha Mitrano...


Prachi