पांघरूनी आभाळ मी

Started by SONALI PATIL, August 21, 2014, 02:51:32 PM

Previous topic - Next topic

SONALI PATIL

पांघरूनी आभाळ मी,
जाणीवानां विरक्त झालो ।

ञाण आणुनी उगाच
काळोखावर आरूढ झालो ...

हसलो होतो कधी,
स्मृती भंग झाली ।

दुखःच्या स्पर्शाने
दुभंगली काळजाची कपारी...

ढग दाटूनी डोळयात साठले ,
परी गहीवर बांध सदृढ ।

पाघंरूनी आभाळ
दगड विसावा ,

काळजाला स्पर्शुन काजळीने
काळोखाचा दिवा जाळीला ...

व्यापून आसमंत,
नियतीचा रोज खेळ नवा नवा ।

छेडता दुखःलाही,
पाझरेल सुखाचा झरा...

मुर्त- अमुर्त भास व्यापीत
दगडात कोरला भाव तुझा ।

देने तुझे तुझ्याच पाशी

ओशाळलेल्या भावनांना,
तुझा आधार हवा....


sonali patil