प्रीत तुझी माझी सजलेली. तुझ्या प्रेमाने भिजलेली.

Started by svjangam, August 22, 2014, 08:57:47 AM

Previous topic - Next topic

svjangam

चांदण्य रात्री प्रीत तुझी बहरलेली. प्रीतीची कळी हृदयात फुललेली 
तुला पाहताच प्रीत मनी उमटलेली. प्रीती मधे सुंदर तू नटलेली.
प्रीत तुझी माझी सजलेली. तुझ्या प्रेमाने भिजलेली.

प्रितीची घागर तुझी सदा भरलेली. प्रीती मधे आहेस तू मुरलेली.
प्रितीच्चा साउलीत तू बसलेली. प्रीतीत मला पाहून तू हसलेली.
प्रीत तुझी माझी सजलेली. तुझ्या प्रेमाने भिजलेली.

प्रीती ओढ तुझ्या लागलेली. प्रीतीची रात्र स्वप्नाने सजलेली.
अबोल प्रीत तुझी लाभलेली. प्रीत तुझी मनात माझ्या भरलेली
प्रीत तुझी माझी सजलेली. तुझ्या प्रेमाने भिजलेली.

सुनिल जंगम 
९९६९७२४३५४