नाते

Started by anolakhi, October 23, 2009, 08:43:46 PM

Previous topic - Next topic

anolakhi

इतुके नाजुक आपुले नाते,
मनी एक-मेकाच्या रहाते,
माझे हसने तुझ्या ओठी,
तुझे हसने माझ्या ओठी दिसते....

अवचित सामोरी येउनी,
मागल्या जन्माचे नाते ओळखुनी,   
अनोळखी सारखे वागत होतो,   
ओळख आता पटुनी,       
का पहावे आपण मागे वळूनी....

तुझ्या तसविरीकड़े मी पाहिले होते,
माझे हरवलेले डोळे पाहुणी,
तुझेहीतर डोळे लाजले होते,
आणि मग त्या रात्री आपले डोळे अकंठ जागले होते....

आपल्यात होते आपल्या फरका एवढेच अंतर,
मनी विचार आपल्या येई एक-मेका नंतर,
प्रश्न देखिल दोघांचे असे शहाणे की,
उत्तर असे एक-मेका कड़े नेमके....

नाते नाही या जन्माचे,
ओळख वाटे कोणा दुसऱ्या युगाचे,
शब्द आपले आपणच जपले,
भावनाही आपणच स्वतहाला आवरे...

नाव नाही, नको वाटे या नात्याला,
बघून हसने एक-मेका येता-जात्याला,
समोर नसूनही डोळ्यात बघून बोलने,
समोर येता नजर हये सोबत खाली पड़ते,