मनास न कळता

Started by SANJAY M NIKUMBH, August 23, 2014, 10:06:25 PM

Previous topic - Next topic

SANJAY M NIKUMBH

मनास न कळता
=============
जीव जडत जातो
जीवास न कळता

मन अडकत जाते
मनास न कळता

कुणीतरी जीवनात येते
पैंजण न वाजवता

काळजात कुणी शिरून जाते
काळजास न विचारता

प्रेमात नेहमी असेच होते
काहीही न ठरवता

हृदय कुणाचे होऊन जाते
हृदयास काही न कळता
=====================
संजय एम निकुंभ , वसई
दि. २३. ८. १४  वेळ : ९.४५ रा .