बाप्पा

Started by Pravin Raghunath Kale, August 31, 2014, 11:17:55 AM

Previous topic - Next topic

Pravin Raghunath Kale


काल रात्री अचानक
स्वप्नात आले बाप्पा
मी म्हणालो थांबा जरा
मारू थोड्या गप्पा

मी म्हणालो बाप्पा
मला जरा सांगा
माणसाचा स्वभाव तुम्हाला
वाटतो का हो बरा

थोडासा विचार करून
मग बाप्पा म्हणाले
प्रश्न आहे खरा
थोडासा विचित्र

पण सांगतो जरा
माणसांच्या स्वभावाबद्दल
माणूस विसरला खरा
संस्कृतीच्या पाऊलखुणा
निसर्गाच महत्त्व
संताची तत्व
सारं विसरून गेला

स्वार्थाच्या मागेपुढे धावत
माणूस पळत राहिला
काहिच हाती नसतानाही
शेवटपर्यंत धावत राहिला

रागाने थोडसं
माझ्याकडे पाहात
बाप्पा पुढे म्हणाले
थांबावं लागेल माणसाला
संस्कृतीचा र्‍हास
थांबवावा लागेल

कारणीभूत तूम्हीच ठराल
सृष्टीच्या विनाशाला
निराशा आपली लपवत
बाप्पा निघून गेले
माझ्या मात्र मनाला
खूपच वाईट वाटले

प्रविण रघुनाथ काळे
8308793007