मॅड टॅब

Started by vilas shahasane, September 17, 2014, 12:32:46 PM

Previous topic - Next topic

vilas shahasane

तो कधी येणार याची वाट पाहत तिच मन कोमेजून गेल
तो आला त्याला पाहिल्यावर मन परत उभारल
पण त्याच त्याकडे कधी लक्षच नाही गेल
जागेवर टॅब नाही दिसल म्हणून त्याच मन विचलीत झाल
कपाट उघडून तिन लपविलेल टॅब त्यान काढल
बोट त्याच टॅबच्या काचेवर नाचू लागल
समोरच्या मित्राशी चॅटिंग करू लागल
तिच करंगळीच बोट त्याच्या रूंद lovely मनगटावरून फिरू लागल
त्याच मन मात्र त्या कृत्रिम संवादात रमल
त्यात तिला कुठ प्रेम नाही दिसल
तिच मन मात्र सुन्न झाल
तिच्या प्रेमळ स्पर्शाच ज्ञान त्याला अजिबात नाही झाल
हे एका इवल्याश्या टॅबमुळ घडल
नेटन सार जग मात्र जवळ आल
पण आपल छोट प्रेमाच जग मात्र दूर गेल
संभाळून रहा यापासून तिन त्याला बजावल
एक बोट कित्येक तास काचेवर मारून जग जवळ करशील
पण सप्तपदी फिरताना माझ्या तुझ्या हातात दिलेल्या नाजूक
करंगळीच्या स्पर्शाला विसरलास तर जग तर काय?
स्वत: पासूनही दूर जाशील
सौ. मनीषा विलास शहासने.

Sachin01 More

Its true.              Net mule khup javalachya lokanpasun dur jato apn.   Even Aai ani baba pasun pn
Moregs

मिलिंद कुंभारे

तसं पाहिलं तर internet/tab/smartphone  हे  दूरच्या आपल्या प्रिय व्यक्तींना जवळ आणतंय........ ज्यांच्याशी आपला प्रत्यक्ष संवाद होऊ शकत नाही त्यांचाशी सहज संवाद साधता येतो ...... पण आपली प्रिय व्यक्ती सोबत असतानाही नुसताच TAB ला चिटकून राहणे बरोबर नव्हे ....... FB, What's app, Scype, line etc ह्यांनी आपल पूर्ण आयुष्यच  व्यापून घेऊ नये असे वाटते ...

हे सर्व एक विरंगुळा कि गरज ?????? भुरळ घालणार अत्याधुनिक तंत्रध्यान कि एक व्यसन ????? प्रसंगावधनाने ज्याचे त्यांनीच ठरवावे !!!!!!  ???