एक घरटे.... प्रेमाने बांधलेले......!!

Started by Satish Choudhari, October 29, 2009, 04:13:32 PM

Previous topic - Next topic

Satish Choudhari

एक घरटे.... प्रेमाने बांधलेले......!!
दुर त्या डोंगरावरती,
एक घरटे आहे मी बांधलेले
कुणीच नाही तिथे आता,
सगळं निर्जन,...
निरस तिथलं पाणी आहे
आता उजाडलेले आहे ते घरटे ...
पहाट तर रोज
उजाडताना दिसते तेथे
पण घरट्यात त्या
अंधार आहे पसरलेला...कधीचा
कधी पाऊस तेथे
थोडा मस्ती करुन जातो
कधी अल्लड वारा घरट्याची
मजाक उडवुन जातो
छप्पर तिथे फाटलेले...
जाळेच जाळे तिथे दाटलेले
पाखरांनी मात्र तिथे
निवारा घेतलेला...
पिल्ल्यांनी त्यांच्या तिथे
जन्म त्या घरट्यात घेतलेला...
किलबिल त्यांची सुरुच असते
अशीच दिनरात्र
रात्र तर तिथे आहेच कधीची..
दिवसही आहे तसाच अंधारलेला...
ते घरटे होते कुणाच्या प्रेमाचे,
कुणाच्या स्वप्नांचे...तुटलेले...
घरट्याचं रुपांतर कधी
घरात होऊ शकलं नाही
माणसांचं राहणं तिथे
त्या घरट्याला लाभू शकलं नाही...
आज उणीव भासलेल्या
त्या घरट्याच्या भिंती
माहित नाही एकमेकांशी
काय बोलत असतील
तेही साक्षी असतीलच...
त्या प्रेमाचे ...भंगलेले..
तेही वाट पाहत असतील...
त्यांची...जे त्याला विसरलेले...
त्यालाही वाटत असेलच....
रुपांतर व्हावे ह्या घरट्याचे ...एका घरामध्ये...
प्रेमाने बांधलेले......!!

-- सतिश चौधरी


justsahil

एखादा जिवलग कुणी येताच तुझ्या जीवनामध्ये.
पुन्हा वळ याच घरट्याकडे....
घरपण देण्यास कमी पडू नकोस कुठे
कारण........
आम्चीसुद्धा इच्छा आहे मनापासून
रुपांतर व्हावे ह्या घरट्याचे......एका घरामध्ये.......

ऑंल दि  बेस्ट.........