*****उत्तर*****

Started by anuswami, September 22, 2014, 05:43:27 PM

Previous topic - Next topic

anuswami

*****उत्तर*****

जवळीक तुझी मी कशी टाळू
आहेस तू  सौन्दर्यपरी
मुळlसाहित खात का कोणी
ऊस गोड लागला जरी



येशील तू जवळ माझ्या
भावना माझ्या हृदयी झेलशील
मर्यादेत मी अडकलोय आता
त्यातून मजला कस सोडवशील



का मला हे जाणवतय
हल्लीच तू माझ्या जवळ येतेस
भाव तुज मुखाचे सांगतात
हृदयी तुझ्या मलाच साठवतेस



वदलिस मज जरी तू
प्रेम करण हा नाही गुन्हा
भावनिक होउन लावतो मी
त्याच मर्यादा पुन्हा पुन्हा



कविता तू होशील माझी
माझ्या शब्दंवारती तुझा हक्क
आपण केवळ मित्रच राहू
असू दे तुज मनी हे पक्कं



प्रेमभावना समजतो मी
तुजलाही सदा समजुन घेईन
पण मर्यादेत ना राहिलो तर
'तिला' काय मी उत्तर देइन.......

कवी : अनिकेत स्वामी, अकलूज
९५५२०३०८२८