लीना

Started by vilas shahasane, September 22, 2014, 09:07:34 PM

Previous topic - Next topic

vilas shahasane

साधेपणाने स्पर्शून गेली मना
साधी सुधी भोळी भाबडी लीना
राहवेना मला शब्द मांडल्याविना
प्रत्येक शब्द होत गेला तिच्यासाठी लीन
नजरेत आहे तिच्या भावूकता लीन
ओठी तिच्या निरागस हास्य लीन
गालावर तिच्या हलकेच खळी होते लीन
तिच्या पूर्ण व्यक्तीमत्वात साधेपणा लीन
सर्वांना लीन होऊन भेटते लीना
साधेपणाने स्पर्शून जाते सर्वांनच्या मना
अनेक शैलीत पारंगत लीना
म्हणूनच, शैलेशात सहज लीन झाली लीना
लीनता तिच्यात पूर्ण झालीय लीन
म्हणूनच, साधीसुधी लीना मोहते मना
हो ना गं मीना?
सौ. मनीषा विलास शहासने.