विषारी अमृत

Started by Anil S.Raut, September 26, 2014, 08:02:41 AM

Previous topic - Next topic

Anil S.Raut

ठरवलंय मीही आता
कुणाच्या इतकंही जवळ जायचं नाही
कि
गालगुचक्याच्या नावाखाली त्यांनी
माझेच गाल `लाल´करावेत!

ठरवलंय मी ही आता
कुणाला इतकाही जीव लावायचा नाही
कि
प्रेमाच्या नावाखाली त्यांनी
माझ्याच जीवाचे तुकडे करावेत !

*अनिल सा.राऊत*
9890884228