* तुझ्या प्रेमात *

Started by कवी-गणेश साळुंखे, September 26, 2014, 01:13:30 PM

Previous topic - Next topic

कवी-गणेश साळुंखे

* तुझ्या प्रेमात *
तुझं माझं प्रेम लोकांना कसं सांगायचं
म्हणुन ठरवलं मी कवितेत मांडायचं
तुझ्या प्रेमात तुझ्या काँलनीत यायचं
मग तुझ्या घरासमोर येउन थांबायचं

तु येशील बाहेर म्हणुन वाट बघत बसायचं
तुझ्या बापाला पाहुन माञ पळायचं
हे तुझ्या काँलनीत येण्याआधीच ठरायचं
म्हटलं उगाच कशाला स्वताहुन मार खायचं

तुझ्या प्रेमात काय काय करायचं
हे माझं मलाच ठाउक नसायचं
तेव्हा तुझ्याच काँलनीतल लहान पोरगं उचलायच
अन दिवसाढवळ्या त्याला चांदोमामा दाखवायचं

तेव्हा माञ सगळेच म्हणायचे याला वेड लागलं कुणाचं
तेव्हा त्या लहान मुलाला गुपचुप खाली ठेवायचं
अन चुपचाप तुझ्या काँलनीतुन निघायचं

शेवटी माझ्या वेड्या प्रयत्नांना यश आलचं
एक दिवस तुझी माझी नजरानजर झालीच
तेव्हा वाटलं गड्या ही पोरगी पटली म्हणुन समजायचं
आणि राञभर त्याच विचारात जागायचं

नेहमीप्रमाणे तुझ्या प्रेमात तुझ्या काँलनीत आलो
अन धक्काच बसला चित्र पाहुन समोरचं
हळदीचा मंडप त्यात तुला बघुन
काळीजच राहिलं तुटायचं
उद्या तुझं लग्न होणार तु
नव-याघरी जाणार
तुझ्या प्रेमात उद्या तुझ्या काँलनीत मी कसा येणार
आता तुझ्या प्रेमात सांग एकटं कसं जगायचं...!
कवी-गणेश साळुंखे...!
Mob -7710908264
Mumbai.

ѧjѧy Gѧиэkѧя

Chan...........तुझ्या प्रेमात सांग एकटं कसं जगायचं...

sakhare jaydip