पाउस आला कि मला तुझी आठवण येते.....

Started by Er shailesh shael, September 27, 2014, 07:25:51 PM

Previous topic - Next topic

Er shailesh shael

पाउस आला कि मला तुझी आठवण येते...
आठवणही अवेळीच यायची पावसारखी
कधी थेंबांची गर्दी तर कधी नुसताच काळोख ढगांचा
तहानलेल्या मनाला आधार त्या टपो-या  थेंबांचा....
त्या थेंबातही माझी अगतिकता दिसून येते
पाउस आला कि मला तुझी आठवण येते....
तळहातावर साचलेल्या त्या इवल्याशा तळ्यात
तुझा गोड चेहरा देऊन जातो पाउस
तर कधी ओंजळीतून निसटलेल्या
गारांचा सोहळा देऊन जातो पाउस
त्या सोहळ्यातही तुझी चाहूल रंग देऊन जाते
पाउस आला कि मला तुझी आठवण येते....
तो उधाणलेला समुद्र वाट पाहत असतो तुझ्या येण्याची
जडला जीव किना-याचाही तुझ्यावर असा
त्यालाही भीती आहे तुझी उमटलेली पावले पुसण्याची
त्या उमटलेल्या पावलांतही लाटांची वेदना दिसून येते
पाउस आला कि मला तुझी आठवण येते.......
ती भेटही अशीच पावसाळी होती
जिथे हातामधले हात सुटून गेले
अन डोळ्यांमधले स्वप्नाचे बांध एका क्षणात फुटून गेले
त्या पावसातही तुझीच आठवण भिजून जाते
पाउस आला कि मला तुझी आठवण येते.......
                                                ---Er Shailesh Shael