* सुख दुःख *

Started by कवी-गणेश साळुंखे, September 29, 2014, 03:33:38 PM

Previous topic - Next topic

कवी-गणेश साळुंखे

* सुख दुःख *
आयुष्याच्या प्रत्येक वळणावरती
असतो सुखदुखाचा फेरा
नाही चुकला कुणाला
कितीही मंतर मारा

सुखदुखाच्या या प्रवासात
चाले संसार सारा
गुरफटलेल्या नात्यांचा इथे
होतो मेळ खरा

सुखास जपती सारे
दुखास मागती किनारा
जीवन जगण्यासाठी इथे
प्रत्येकाचा वेगवेगळा सहारा

सुखात होतो सामील
हा समाज सारा
दुखात सोडुन जातो
प्रत्येक आपलासा वाटणारा

सुखाचे अनेक मुखवटे
दुखाला एकच चेहरा
सुखासाठी असतो पहारा
दुखाला मिळेना लुटणारा...!
कवी-गणेश साळुंखे...!
Mob -7710908264
Mumbai