* झोपडी *

Started by कवी-गणेश साळुंखे, September 30, 2014, 02:29:22 PM

Previous topic - Next topic

कवी-गणेश साळुंखे

* झोपडी *
गावाच्या वेशीवर आहे
या गरीबाची झोपडी
तुटकी फुटकी मातीची
आहेत काही मडकी

उन वारा पाऊस
कमतरता नाही थोडी
फाटक्या चादरीतुन माझ्या
शिरु लागते थंडी

तीन दगडांची चुल
सरपणात जाळतो काडी
जेवणात माझ्या रोज
शिळ्या भाकरीची तुकडी

कशाला हवी गाडी
अन पाटलाची माढी
मायेची उब देते
मला माझी झोपडी...!
कवी-गणेश साळुंखे...!
Mob -7710908264
Mumbai

karan Nalbhe

Aaj tichi khup aathwan yete mala aathwanit hear win to due jate