* म्हणणारे *

Started by कवी-गणेश साळुंखे, October 01, 2014, 09:27:15 AM

Previous topic - Next topic

कवी-गणेश साळुंखे

* म्हणणारे *
साथ सोडणार नाही
म्हणणारे साथ सोडतात
दगा देणार नाही
म्हणणारे दगा देतात

विश्वास ठेव माझ्यावर
म्हणणारे विश्वास तोडतात
आश्वासन देणारे सगळेच
पाळणारे कुठे मिळतात

प्रेमात आकंठ बुडवल्यावर
किना-यावरच सोडुन जातात
पहिल्या पावसाच्या सरी
जशा डोळ्यांतुन बरसतात

प्राण जाए पर
वचन ना जाए
म्हणणारे इतिहासातच दिसतात
आताच्या जगात अशी
लोकं कुठे मिळतात...!
कवी-गणेश साळुंखे...!
Mob -7710908264
Mumbai.