मनमंदिरातील देवा

Started by GAURAV, January 24, 2009, 08:12:55 PM

Previous topic - Next topic

GAURAV

आज मी माझ्या मनात एक मंदिर उभारलय
त्यात देव म्हणून फ़क्त तुलाच वसवलय
करणार नाही मी ह्या मंदिराच्या गाभार्‍यात इतर कुणाची स्थापना
माझ्या प्रेमाची फूले वाहुनी करीन तुझीच पूजाअर्चना
आरतीतूनी माझ्या गाईन तुझे गुणगान
संरक्षणास तुझ्या लावीन प्रणाला माझे प्राण
तुझ्यावरची माझी श्रद्धा कधी होणार नाही कमी
भक्ती माझी अखंड राहिल ह्याची देतो मी हमी
तुझ्याच आराधनेमध्ये देवा मी माझे सर्वस्व वाहीन
माझ्या प्रेमाने तुजभोवतालच्या दशदिशा उजळविन
होणार नाही ह्या मंदिरात प्रवेश इतर कुठल्या देवाचा
गरज भासल्यास प्राण त्यागून देईन पुरावा माझ्या प्रेमाचा
वाटतय देवा आता तुझ्याकडे काहीतरी मागाव
तू नेहमी मला एकट्यालाच तुझा परमभक्त मानाव.

-- गौरव देसाई

MK ADMIN