*विसरुन जा तिला*

Started by Lyrics Swapnil Chatge, October 04, 2014, 03:44:22 PM

Previous topic - Next topic

Lyrics Swapnil Chatge

* काल माझं अन् माझ्या मनाचं जरासं भाडंण झालं...
------------------------------
कितितरी समजावल मनाला,
की विसरुन जा तु तिला...

नको रे आठवु सारखा असा,
कसला हा त्रास स्वत:ला....

मन हलक्या स्वरात म्हणाला,
मी तर विसरुन जाईन रे तिला...

पण विचार एकदा तुझ्या हद्याला,
का तो हद्यातुन काढू शकेल तिला....

विचार तुझ्या तरसणार्या डोळयाला
का इतका क्षणक्षण झुरतो भेटायला...

अलगद मिटताच नाजुक डोळे,
का  आठवते ती पुन्हा क्षणाक्षणाला...

तुला का भास होतात तिचे सारखे,
कधी विचारलसं बावर्या स्पंदनाला...

का ती धुदं नशा बनून भिनते,
विचार तुझ्या गंधाळलेल्या तनाला...

अन् तु म्हणतो मला की,
"विसरुन जा तिला"

------------------------------
स्वप्नील चटगे
-------------------------------