मी कोंडून पडलोय कवितेच्या तळघरात

Started by madhura, October 04, 2014, 09:12:40 PM

Previous topic - Next topic

madhura


मी कोंडून पडलोय कवितेच्या तळघरात
काळोखाचा वारा वाहतोय खूप जुना
मी -सिगारेट बॅटरी सारखी धरून
तळघरात शोधतोय हरवलेली अक्षरे
तर एखाद्या ओळीचा अडथळा
येऊन मी धडपडतो.
मी - शब्दांच्या गजांवर डोकं आपटुनही
रक्तबंबाल होत नाही
अंधाअ अधिकच लपेटून राहतो मग मला
मी तळघरातून नवीन रस्ता धुंडालायचा
प्रयत्न करतो केविलवाणा
मग मला अंधारातल्या असुरक्षिततेक्षा
कवितेची काळजी वाटते.
मी शोधतोय ती अक्षरे
कुणाची तरी हरवलेली असतात.
फक्त ज्ञानेश्वरांची, मर्ढेकरांची की रेग्यांची
एवढाच प्रश असतो.
त्यांच्या काळोखी समाधीकडे मला
किलकिला उजेड दिसतो दूरवरून
आणि तिथपर्यंत पोहचायला
माझ्याकडे स्वतःचा उजेडही नसतो थेंबभर.

....कैलास गांधी