त्यांच्यासाठीच अता आपण लिहाव...

Started by Ankush S. Navghare, Palghar, October 08, 2014, 11:40:18 PM

Previous topic - Next topic

Ankush S. Navghare, Palghar

तिला म्हटलेले की
पुढच्या वेळी तुझे अश्रु मला दे
मी काहीतरी जादू नक्कीच करीन
जश्या पणत्या साईंनि लावल्या
स्वताचा आत्मा तरी नक्कीच उजळविन
पण जे आधीच वाहिले त्यांच काय झाल
माझी अपेक्षा नाही की
फ़क्त ह्या साठी तिने रडाव
म्हणून म्हटल जे वाहून गेले
त्यांच्यासाठीच अता आपण लिहाव
त्यांच्यासाठीच अता आपण लिहाव...

.... अंकुश नवघरे
(स्वलिखित) रात्रो.. ९.४७. ०७.१०.२०१४