काल ती अवेळीच आली...

Started by Anil S.Raut, October 11, 2014, 10:31:04 AM

Previous topic - Next topic

Anil S.Raut

काल ती अवेळीच आली
तेव्हा वाटले माझीच होणार...
पडून गळ्यात माझ्या ती
हुंदक्यांनी अशी दाटणार....
तोडून आले रे सारे बंध
म्हणत हमसुन रडणार.....
रडता रडता स्वतःबरोबर
मलाही अश्रुत भिजवणार...
दिलासा देताच कवेत घेऊन
स्वप्ने नवी दाखवणार...
प्रेमाच्या अशाश्वत दुनियेत
आमचे प्रेम सफल होणार....

काल ती अवेळीच आली
गळ्यात पडुन हमसुन रडली
कुजबुजली अर्धवट शब्दात
आता मी दुस-याची होणार...!

*अनिल सा.राऊत*
9890884228

सुमित

#1
Khup khup khup sundar..Mitra...

Asech lihit raha.
सुमित

Anil S.Raut

धन्यवाद मिञा...
तुझ्या लिखाणास माझ्या लाख लाख शुभेच्छा!!!!

sagarraut3737


Anil S.Raut


ankush sahane



Anil S.Raut

अंकुश जी आणि शैलेश जी
दोघांचेही मनापासुन आभार!!!

सतिश

फारच छान अनिल साहेब..!!

Anil S.Raut

मनःपूर्वक धन्यवाद .....सतिश जी  !!!!