कीती गं हळवं हे तुझं माझं प्रेम.....

Started by Shraddha R. Chandangir, October 13, 2014, 11:12:24 AM

Previous topic - Next topic

Shraddha R. Chandangir

कीती गं हळवं हे तुझं माझं प्रेम
तु वार फुलांचा, मी तुझा न चुकलेला नेम.....

आजही आठवते ती तुझी पहीली अदा
नजर चूकवून तु लाजली, आिण मी झालो फीदा....

हवेच्या झुळकेने रेशमी केस तुझे वीखुरले
ठोका चुकला काळजाचा, पण मी ही मज सावरले.....

आताही जेव्हा ऐकतो तुझ्या पैंजणांंची रूणझूण
कसं गं सांगु सोनु, क्षणात जातो मी हरपून....

गर्व करत असेल आज तो दरपणही स्वत:वर
त्याला बघून तु लाजतेस, मी हसतो माझ्यावर....

तुला भेट देण्यास एक गुलाब वीकत घेतो
पण ते तुझ्यावर जळेल म्हणुन स्वत:च लपऊन देतो.....

कीती गं प्रेम हे व्यक्त करु, शब्द अपुरे आहेत.....
तुझ्यावीना राणी माझं जीवन अधुरं आहे.....

हातात तुझा हात घेऊन करेल या जगावर मात
वचन देतो आज, मी देईल जन्मभर साथ....
[url="http://anamika83.blogspot.in/?m=1"]http://anamika83.blogspot.in/?m=1[/url]
.
[url="https://m.youtube.com/channel/UCdLKGqZoeBNBDUEuTBFPRkw"]https://m.youtube.com/channel/UCdLKGqZoeBNBDUEuTBFPRkw[/url]