स्वरूपानुसंधान

Started by विक्रांत, October 28, 2014, 12:12:34 AM

Previous topic - Next topic

विक्रांत

स्वरूप म्हणजे स्वत:चे रूप आणि ते जाणणे म्हणजे स्वरूपज्ञान अथवा आत्मज्ञान

स्वरूपानुसंधान ..म्हणजे मी या स्फुरणा मागे असलेले चैतन्य हे माझे स्वरूप आहे हे जाणून त्या जाणिवेशी सतत सलग्न राहणे ,सुरवातीला सोहम हा मंत्र अनुसंधानासाठी वापरला असता सो म्हणजे ते परमात्मतत्व आणि अहं म्हणजे मीच आहे अशी धारणा उपयोगी पडते .श्वासा सोबत केलेले हे अनुसंधान अधिक उपयोगी ठरते .ते अवघड वाटत असेले तर कुठल्याही देवाचे नाम घेतले अरी चालेल परंतु ते नाम म्हणजे त्या ध्यान काळातील माझे शुद्ध स्वरूप आहे हे ध्यानात ठेवावे , त्या मुळे ध्यान करतांना आपण कुण्या देवाकडे जात आहोत वा तो देव आपल्याकडे येत आहे अश्या भावनेपेक्षा आपण आपल्या नित्य अनुभवाच्या मी कडे अधिकाधिक जवळ जात स्वत;ची नवी ओळख करून घेतो असे नाही केले तर नेहमी स्वत: पासून दूर असलेल्या देवाच्या कल्पनेत अन तो आपल्याला येवून भेटेन या प्रतीक्षेत जीवन संपून जाईल.

थोडक्यात मी या स्फुरणामागे असलेले चैतन्य हे माझे स्वरूप आहे .मंत्र सहित ध्यान करीत आपण स्वरूपाच्या अधिक जवळ येणे अपेक्षित आहे म्हणजे मन माझ्या अस्तित्वात , आत्मस्फुरणात राहणे अपेक्षित आहे त्यावेळी इतर कुठलीही कल्पना करीत बसू नये

स्वामी माधवानंदाच्या (पुणे ) प्रवचनाच्या आधारे