भारतीय संस्कृती ?

Started by किरण गव्हाणे, October 29, 2014, 11:18:41 PM

Previous topic - Next topic

किरण गव्हाणे

 भारतीय संस्कृती ?

परवा पुण्याहुन नासिकला आलो. तशी मला सुट्टी लागुन ४ दिवस झाले होते. मी रात्री निघायच्या बेतात होतो, पूर्ण bag भरून झाली होती. फक्त रात्री निघतोय म्हणून घरी माहित असलेल बर अस वाटल पण बाबा म्हणालेत कि दिदीचे पेपर पण संपणारच आहेत तर थोडा थांबून घे, सोबत या दोघही. मग ठरल्याप्रमाणे मी दिदीचा पेपर झाल्यावर तिला हॉस्टेल वर न्यायला गेलो. शिवाजीनगर ला गेल्यावर कळल कि गाडी आताच गेलीय आणि आता एक तास तरी वाट पहावी लागेल. नशिबाने एक एक्सट्रा गाडी आली आणि पटकन गाडी भरली देखील. आमच्या शेजारच्या सीटवर एक ६५ – ७० वयाच्या आजी बसल्या होत्या. गाडी सुरु झाली अन लगेच आजी मागच्या सीटवर बसलेल्या त्यांच्या मैत्रिणीसोबत गप्पा मारायला लागल्या. त्या बहुतेक बहिणीकडे चालल्या होत्या. बोलता बोलता त्यांचा विषय मुलांवर आला. तर आजी म्हणाल्या मला तर आता त्याची अजिबात आठवण येत नाही. त्यांना आपली आठवन येत नाही, त्यांना आपली काही काळजी नाही मग आपण तरी कशाला त्यांचा विचार करायचा. आता मला थोड थोड कळायला लागल होत, त्या आजींचा मुलगा बहुतेक बाहेर परगावी, परदेशी असावा. आजी पुढे सांगत होत्या कि माझी मेस ची मुले येतात कधी कधी, विचारतात आजी कशा आहात, तेवढंच फार झाल. आता तर सद्गुरूच माझा बाप,आई,मुलगा सगळ काही आहे. जाऊ दे न म्हणे,इतका विचार करतोय आपण त्यांचा.
[size=0pt]दुसरी आजी बहुतेक रिटायर्ड झाल्या होत्या, कारण त्यांना पेन्शन होती. त्या बोलल्या कि तर माझ्या सुनेला सांगून ठेवलय, मी काही तुझ्या नवर्याच्या पैशावर नाही जगत, माझी स्वताची पेन्शन आहे. त्यामुळे जास्त बोलू नको. हे ऐकून तर मला धक्काच बसला. कोणी अस कस बोलू शकत, आणि मुख्य म्हणजे अस बोलायची गरजच का पदवी त्या आजींवर. मुलगा त्यांचा, घर त्याचं आणि तरीही आज त्यांना हे अस जगाव लागतंय.[/size]
[size=0pt]त्यावर पहिली आजी बोलल, मी तर सांगत असते कि माझा मुलगा परदेशी गेलाय म्हणून नाही दिसत तो इकडे, उगाच कशाला लोकांना खर सांगायचं. म्हणजे तो कुठे परदेशी नव्हता! आपण आपल काम करायचं, सदगुरू आपल्याला काही कमी पडू देत नाही बघ. तोपर्यंत त्या आजीना कळल होत कि मी त्याचं बोलन मन लावून ऐकतोय म्हणून, थोड्यावेळाने त्या आजी मलाच म्हणाल्या अरे बाळा आज दहा पैकी एखादाच चांगला निघतो. माझ्या डोळ्यात पाणीच आलं. मी आजीनां सांगितल हि माझी बहिण आहे. तिला सांगतोय कि ऐक आजी काय सांगताहेत ते. त्यावर आजी हसल्या बोलल्या बाळा आई, बहिणीला पहिल्या पगारातून कपडे घे. त्यांचा आशीर्वाद मिळाला तर सदगुरू पण आशीर्वाद देतील. तेवढ्यात आमच्या समोरच्या सीटवर बसलेली एक बाई बोलली, आजी तुम्ही समर्थांच्या भक्त आहात का? आजी हसल्या अन म्हणाल्या हो. तर ती बाई बोलली माझा भाऊ आईला वृधाश्रमात टाकायचं म्हणतोय, आईला पेन्शन आहे पण तरी घरी ठेवायला नही म्हणतोय आता. म्हणून मग मीच घेऊन चाललेय आईला माझ्या घरी, घरी यांची आई असते तर विचारून बघितल कि माझीही आई इथे राहिली तर चालेल का म्हणून....आणि तिचा नवरा चक्क हो म्हणाला होता. इथे त्या आजीला स्वताचा मुलगा सांभाळायला नाही म्हणाला, पण जावई तयार झाला. यात तिच्या मुलाला नालायक म्हणव कि जावयाला खूप चांगला, असा विचार करत असताना आजी बोलल्या बघ बाई, आईला घेऊन चाललीस खर,पण नीट काळजी घे. मनापासून सेवा कर आईची, सदगुरू नक्की तुझ भल करतील. हा लेख लिहायचं कारण एवढंच कि वाटल कुठे तरी तरुण पिढी चुकतेय. ज्या आई बापानं आपल्याला लहानाचं मोठ केल, त्यांना आपण अस म्हातारपणात एकट कस टाकू शकतो. म्हणून माझ्याकरता हा फक्त लेख नसून एक agriment आहे, स्वताच स्वताशीच केलेलं, कि काही झाल तरी माझ्या आई वडिलांवर हि परिस्तिती मी कधीही येऊ देणार नाही आणि याची नोंद म्हणून मी हा लेख जपून ठेवणार आहे. आईला सांगेन बघ हा लेख आणि जर कधी मी चुकलो तर आठवन करून दे मला म्हणून ![/size]

Rajesh khakre

 खुप छा न किरण
लेख आणि विचारही

choudharyanilk


किरण गव्हाणे

thanks chaudharyanik.. तू माझे दुसरे आर्टिकल वाचले का? मी आणि पावसाळा..

savita nare

apratim. ai vadilansathi konatihi gost soda, pan kpnatyahi gostisathi ai vadilana sodu naka. Dhanyavad.