दुरावली मैत्री

Started by विक्रांत, October 30, 2014, 08:07:58 PM

Previous topic - Next topic

विक्रांत


अवघडली नाती
अवघडू देत
दुरावली मैत्री
दुरावू देत
रागावली प्रीती
रागावू देत
जास्त ओढशील
तर तुटतील
सोडून दे
केव्हातरी भेटतील
नाहीच भेटली तर
नच भेटू देत
मनी त्याचा सल
नच राहू देत
फुल गळून पडतं
कुणी खुडून नेतं
झाड का कधी त्याचं
दु;ख करीत बसतं
प्रत्येक नात
असंच असतं
कधी आयुष्यभर टिकतं
कधी क्षणात मिटून जातं
आपण मात्र सतत
फुलत राहायचं असतं
कारण
झाड होवून जगणंच
खरं जगण असतं

विक्रांत प्रभाकर