** सोबत सोडली तू **

Started by Lyrics Swapnil Chatge, November 03, 2014, 02:47:24 PM

Previous topic - Next topic

Lyrics Swapnil Chatge

वाटेवरी तू सोबत सोडून गेल्यावर,
या शब्दानेच मला साथ दिली होती...
एका अनोळख्या विश्वात नेवून मला,
या कविताशी नाती जुळून दिली होती...

तुझ्या विरहाचा हूदंका गिळून मी,
ती विखूरलेली स्वप्न गोळा करत होतो...
तुटक्या मुटक्या शब्दात का होईना,
पण अबोल भावनेला कवितेत गूफंवत होतो...

माझ्या जीवनातील प्रत्येक पहाट ही,
त्या ओसर साजंवेळी सारखी होती...
शेवटी कितीही उगवलं तरीही ,
पून्हा ती मावळण्याची वेळ होती...

आता नकोशी वाटतात ती माणसं,
ती नाती जे पहिले हवेहवेसे होते...
कारण ह्या अनोळख्या जगातून मला,
आपल्याच माणसांनी हाकालून दिले होते ....!!

Special Thanks:-
हर्षवर्धन घोडके

© स्वप्नील चटगे.
(अबोल मी)
दि.02.11.2014
-------------------------------


Lyrics Swapnil Chatge


सतिश

सुंदर लिहिली आहेस स्वप्नील..

Lyrics Swapnil Chatge

सतिश जी धन्यवाद..

जरा तुमची मराठी भाषा कच्ची आहे.

Prathamesh Mane

Really nice one...
shabdanche gumphan khup changale ahe..

Lyrics Swapnil Chatge

आभारी आहे प्रथमेश माने..
__/\__

सतिश

#7
असंही असू शकत... पण तुमचे हे मत कशामुळे झाले ते कळले तर मला काही सकारात्मक प्रयत्न करता येतील..
Please tell me.

Lyrics Swapnil Chatge

तुम्ही तुमची पहिली रिप्ले पोस्ट वाचा
आपण मला
सुदंर लिहिली आहेस स्वप्नील म्हणाला
पण मी पुल्लिगं असल्याने तूम्ही "लिहिली"च्या ऐवजी "लिहला" असा शब्द वापरायला हवा होता...
आभारी

Anil S.Raut

सतिशचेच बरोबर आहे स्वप्निल जी!
कविता सुंदर लिहली असा त्याचा अर्थ होतो..
कविता ही स्ञीलिंगीच आहे....
आपल्या लेखनास माझ्या हार्दिक शुभेच्छा!!