मी मराठी

Started by Sachin01 More, November 07, 2014, 06:31:26 PM

Previous topic - Next topic

Sachin01 More

प्राणाहुनी प्रिय असे ही माती,
जिथे बोलतो आम्ही मराठी.
स्वर्गापेक्षा सुंदर वाटते,
हि जन्मभूमी आमच्यासाठी .

मानवतेची शिकवण देते,
समाज रक्षणासाठी.
जागवू नका आमच्या अस्मितेला,
प्रसंगी प्राणाची आहुती देऊ ,
करण्या मायबोली रक्षणासाठी...
जिद्दिने लढले मर्द मावळे स्वराज्यासाठी, समतेची बिजे पेरली जनकल्याणासाठी,
अन्यायाला वाचा फोडली माणुसकी कळण्यासाठी.
जन्मास आली थोर माणसे याच भूमीवर
निस्वार्थ बलिदानासाठी....!!!
Moregs