एक कथा...... गंध हरवलेल्या केतकीची.... भाग 2

Started by Shraddha R. Chandangir, November 07, 2014, 06:55:16 PM

Previous topic - Next topic

Shraddha R. Chandangir

जगाकडे, जगातील लोकांकडे बघण्याचा दृष्टिकोन बदलायला लागतो.
अचानक जुने अर्थपूर्ण गाणे आवडायला लागतात. Feelings, Emotions,
विश्वास, मैत्री, नातं यांचे नविन अर्थ कळायला लागतात.
केतकी बद्दलही नेमकं तेच होत होतं. घरातलं
हे jail सारखं वातावरण
कुठेतरी तीलाही खटकायला लागलं
होतं. आई-वडीलांच प्रेम, त्यांचा सहवास,
त्यांच्याशी मनमोकळे पणे संवाद
यांची तीला प्रकर्षाने गरज भासत
होती. आपल्या आयुष्यात
काहीतरी missing आहे असं सतत
तीला वाटत होतं. काहीतरी??
काहीतरी म्हणजे काय?? नेमकं काय
missing असेल?? प्रेम?? आई-वडीलांचं प्रेम?? आई-
वडीलांचा सहवास? त्यांच्याशी संवाद?? हो!!!
नेमकं हेच missing होतं. पण एका 14-15
वर्षांच्या मुलीला हे सगळं clear कळेल?
एवढी maturity तीच्यात
होती?? एवढी समज तीच्यात
होती?? नाही!!! नव्हतीच!!!
आपल्या आयुष्यात नेमकं काय बिनसत चाल्लं आहेहे
तीलाही कळत नव्हतं. मग
अशा परिस्थितीत माझ्या आई-
बाबांना माझी गरजच नाही. गरज आहे
ती फक्त माझ्या चांगल्या अभ्यासाची,
चांगल्या मार्कंची, हे नव-नविन गैरसमज
तीच्या डोक्यात घर करायला लागले होते. तीचं
वय लहान, त्यामुळे हे विचार ती सहज
काही नातेवाईकांपूढे बोलून बसायची. पण
शेवटी ते ही so called Indian
Relatives. Chance कसा सोडणार?? ते
ही तीच्या विचारांचा विरोध न करता मुद्दामुन
त्याला समर्थन करायचे. तीच्या मनात आई-
वडीलांबद्दल द्वेष वाढतच चालला होता. आई-
वडीलांनाही नेमकं कळत नव्हतं.
आईचा स्वभाव तापट असल्यामुळे रागाऊन, मारून
ती तीला अभ्यासाला बसवायची.
बाबांचा स्वभाव शांत असल्यामुळे ते कधीच आई
आणि केतकी च्या मधात लुडबुड नाही करायचे.
बघता बघता ती दहाव्या वर्गात गेली.
तीचं वय वाढत होतं. तशीच
तीची हिम्मत ही वाढत
होती. तीचं एकटेपण वाढलं होतं.
तीचा राग वाढला होता. 10 वी चं वर्ष असल्याने
मीत्र
मैत्रीणीही आपापल्या अभ्यासात
गुंतले होते. पण ही मात्र अभ्यासापासून तुटत
चाल्ली होती. तीचं शाळेत जाणं
कमी झालं होतं. शिकवणी वर्गाला जाणं
तीने सोडून दीलं होतं.
अशा परिस्थितीत मामांचा phone आल्यावर
तीची आई त्यांना सांगायची,
केतकी चं काय विचारता?
ती वाया गेली..... आमचं नाव
मातीत मीळवायला निघाली. 90%
तर दूरच... 10 वीत निदान पास
जरी झाली तरी आमचं
नशीब. एवढं सगळं खायला, प्यायला, कपडे-लत्ते... पण
शेवटी तीने
तीची लायकीच
दाखवली. तापट स्वभावाच्या आईला,
केतकी ला मार्गावर आणण्याचा हा एक उपायच वाटत होता.
पण या विरुद्ध, आईचे हे शब्द ऐकून
ती कायमची तुटली होती.
सगळे मीत्र-मैत्रीणीह
ी तीच्यापासूऑ दुरावले होते.
तीच्या विचारांच समर्थन करणारे नातेवाईक
ही आता तीच्यावर
आणि तीच्या आई-वडीलांवल हसायला लागले
होते.
जन्मदात्यांनी लायकी दाखवली.......
कोढी तीच्या character वर बोट उचललं.....
कोणी जादूटोण्यामुळे तीला वेड लागल्याचं
चारचौघांना सांगीतलं..... ज्याला जसं वाटेल, तसं तो मत मांडून
मोकळा झाला.
केतकी चं वय लहान. त्यामुळे तीचा problem
तीला maturity ने हाताळता आला नाही. आई-
वडीलांनी तीला समजून घेतलं
नाही. मीत्र-
मैत्रीणींनी पाठ
फीरवली.... नातेवाईकांमध्ये हसू
व्हायला लागलं.
या सगळ्या त्रासापासून मुक्त
होण्याचा शेवटी तीच्याकडे एकच पर्याय
उरला......... "आत्महत्या"

-अनामिका
[url="http://anamika83.blogspot.in/?m=1"]http://anamika83.blogspot.in/?m=1[/url]
.
[url="https://m.youtube.com/channel/UCdLKGqZoeBNBDUEuTBFPRkw"]https://m.youtube.com/channel/UCdLKGqZoeBNBDUEuTBFPRkw[/url]