मी अंधश्रध्देचा चोर

Started by sanjay limbaji bansode, November 08, 2014, 04:02:37 PM

Previous topic - Next topic

sanjay limbaji bansode

ढोंगी साधुच्या अज्ञानाची
गळ्यात घाली दोर !
मनात आले त्याला पुजीतो
मी अंधश्रध्देचा चोर ! !

मांजर आडवे गेल्या समजतो
नुकसान होईल घोर !
मनात आले त्याला पुजीतो
मी अंधश्रध्देचा चोर ! !

द्रुष्ट झाली मीठ,मिरची उतरवीतो
समोर आणून पोर !
मनात आले त्याला पुजीतो
मी अंधश्रध्देचा चोर ! !

नवस केल्या बोकड कापीतो
होऊन पापीखोर !
मनात आले त्याला पुजीतो
मी अंधश्रध्देचा चोर ! !

मंदिर दिसले, हात जोडीतो
करून भक्तीचा शोर !
मनात आले त्याला पुजीतो
मी अंधश्रध्देचा चोर ! !

संजय बनसोडे