कुणास ठाउक?

Started by गणेश म. तायडे, November 09, 2014, 10:18:10 PM

Previous topic - Next topic

गणेश म. तायडे

का कुणास ठाऊक?
प्रेम का झाले मज?
का कुणास ठाऊक?
इतके का प्रेम केले मि तुज?

कधी न मी तुला काही मागितले,
कधी न तु मला काही सांगितले...

प्रेम केले मी तुज जिवापाड,
पुरविले तुझे हट्ट सर्व लाड...

भिती दाटलेली आहे मज मनात,
सोडून तर जाशील नाही न एका क्षणात...

अवभाग्य माझे तु माझ्या जिवनात आली,
दुर्भाग्य तुझे मी तुझ्या जिवनात आलो...

तु मला नेहमी हवी-हवीसी वाटते,
मी तुला नेहमी नको-नकोसा वाटतो...

प्रेम केले मी तुज नाही कोणता गुन्हा,
नाही सहन होत सहने, असे दुःख पुन्हा-पुन्हा...

प्रेम आहे तुझे तर दे सादेला प्रतिसाद,
नको मला काही, दे फक्त एकदा हातात हात...

भांडलो मी तुजसाठी, रडलो मी तुजसाठी,
तुच माझे कारण, तुच माझे अकारण...

सांग कधी होशील माझी, प्रतीक्षेत मी उभा आहे,
नको मला तुज काही, फक्त प्रेम तुझे हवे आहे...

- गणेश म. तायडे
खामगांव
ganesh.tayade1111@gmail.com

P Dhiraj sakhare

. . . . .khup chan! "Premach khara arth kalal" . . . :)