फास

Started by sujitbade12345, November 15, 2014, 12:02:13 PM

Previous topic - Next topic

sujitbade12345


अनवानी चालताना पायी मोडला काटा
वरसानूवरसाची परंपरा काय मोड़ना
नकू तव्ही खेटर अन ह्या मऊ वाटा
ह्ये गावाबाइरच जगन काय सुटना

गावकुस बरी लेका आपुली 
गावातली माणुसकी काय रुचना
संपता संपता संभर पिढ्या संपल्या
पन हा नागिनीचा फास काय तुटना

उघड्यावरचा महा अंधार बरा
गावातल्या प्रकासात काही दिसना
मही शीळी भाजी भाकरी बरी
त्वह गोड जेवन काय मला पचना

गुदमरनाऱ्या हवातला जीव महा बरा
त्वह्या मोकळया हवेतील श्वास मला जाइना
नकू तुझी उपकाराची नजर
मह जनमो जनमीच पाप काही फिटना