खोड

Started by डॉ. सतीश अ. कानविंदे, November 18, 2014, 02:32:49 PM

Previous topic - Next topic
खोड
(१६ फेब्रूवारी १९९७ च्या लोकसत्ता 'किशोरकुंज'मध्यें प्रकाशित)

खूप अभ्यास करून मी
प्रत्येक परिक्षेत पहिला येतो
शिक्षकांची शाबासकी अन्
बक्षिसं सारी मीच घेतो

कुठल्याच खेळात माझा कधी
धरत नाही कुणी हात
माझ्याशी स्पर्धा करणा-याचा
नक्की होतो पुरता घात

उत्कृष्ठ विद्यार्थ्याचा मान
आजपर्यंत मी नाही सोडला
कुठलाच माझा विक्रम पहा
अजून नाही कुणी मोडला

वागणं माझं सौजन्याचं
बोलणं असतं त्याहून गोड
एकच दुर्गुण म्हणजे मला
खोटं बोलायची आहे खोड

सतिश


धन्यवाद सतिश