चूक काय

Started by Sachin01 More, November 23, 2014, 01:24:39 PM

Previous topic - Next topic

Sachin01 More

अठरा वैश्याची दारिद्री,
नाही कुणाला त्याची काळजी,
पैशाविना हि माणसे झालीया पोरकी.
पोट भरण्यासाठी मागतात फक्त भाकरी,
विकसित म्हणणार्या या नगरातही लेकरं करतात पोटासाठी चाकरी.
राहायला नाही त्यांना कशाचाच आसरा,
उघड्या फुटपाथवरच त्यांच्या जगण्याचा पसारा.
शिक्षणाचा यांच्याशी काही संबंधच नसतो,
नेत्यांना हा फक्त निवडणुकांत दिसतो..
राहायला नसल जरी त्यांना घर,
तरी तुम्हाला त्याचा फरक पडावा का बरं?
आनंदाला त्यांच्या कधी वेळच नसतो,
दु:खातच त्यांचा जीव गुंतलेला असतो.
नको आहे त्यांना अजुन काही तुमच्यापासुन,
छळू नका त्याला, जगु द्या माणूस म्हणुन...
Moregs