तुझा सहवास

Started by nirmala., November 14, 2009, 12:38:33 PM

Previous topic - Next topic

nirmala.

तुझा सहवास

तुझ्या सहवासातील ते दिवस,
अजूनही मला आठवतात
कधी हसत, कधी रुसत,
जाणून बुझून तुझी आठवण करून देतात.

तुझेच विचार मनात घेऊन
जगत असते नव्या आशेने
सहवासातील ते क्षण टिपते मी स्वप्नाने

त्या स्वप्नाला जपण्यासाठीच
मला तुझा आधार हवा
म्हणूनच,.............
आयुष्यभरासाठी मला तुझा सहवास हवा...........

                    - निर्मला........

tanu

Good one...pan apoorna ka vatat ahe mala he kavita ?  ???

nirmala.

thanx tujhya comment sathi..........

               ummmm......... ani ho aselahi kadachit ti kavita apurna....................
                karan majhya bhawna purnapane mandayla tya kavitance shabd apure padle.........so............mhanun......... ;)

Prachi

ooohhhhhhhhhhhhh !!! toooooooo gooooood..............

hey nirmala... plz dnt mind ..ok ..r these ur  actual feelings..?? ?? ???

nirmala.

ya dear parachi.............actuall felling aslyashiway kavita tayarach kashi hou shakte na?????????

Prasad Chindarkar

तुझा सहवास
गंधीत झालेल्या एका फुलाचा मोकळा श्वास

तुझा सहवास
दूर अंधुक टेकड्यांवरचा मावळता सूर्यप्रकाश

तुझा सहवास
आतपासुन भरुन येणारा जडसर निश्वास

तुझ्या सहवासात हरवुन जातो मी
शुभ्र पांढर्‍या तुषारांवर अलगद तरंगतो मी

तुझ्या सहवासात जखम एक भरुन येते
तु गेल्यानंतर वेडीवाकडी कविता एक जुळुन येते!

आठवतो तुझा हात होता माझ्या हातात
तुझ्या घराकडचे डोंगर उगाच रंगात न्हातात

वेड्यावाकड्या शब्दांशी असाच खेळतो मी
एकलेपणाच्या ओझ्यात असाच साचतो मी!

ओझ्याखाली दबुन जायला खरं मला आवडत नाही
तुझ्या आठवणींचं ओझं माझ्याच्यानं टाकवतं नाही!

nirmala.