माझ्या शेतीचे होईल कसे आता

Started by sanjay limbaji bansode, November 27, 2014, 09:49:43 PM

Previous topic - Next topic

sanjay limbaji bansode

( ही कवीता जुलै 2014 ला केली )


जून गेला जुलाई आला
पावसाचा नाही अजून पत्ता!
सांग देवा या वर्षी
माझ्या शेतीचे होईल कसे आता ! !

आकाशाकडे नजर लावूनि
मने आमुची हरली
अजूनही शेतातील
ढेकळे नाही मुरली
गुरां ढोरा चारन्या
वैरन नाही उरली
कारभारीन माझी रडून रडून
बेहाल झाली आता !
सांग देवा या वर्षी
माझ्या शेतीचे होईल कसे आता ! !

महागाई मुळे झालो
पहिलेच आम्ही बेजार
500 ची खताची गोणी
आता झाली अडीच हजार
कासावीस झाले माझे
हे तहानलेले सिवार
देशील का कधी देवा
माझ्या हातीही सत्ता !
सांग देवा या वर्षी
माझ्या शेतीचे होईल कसे आता ! !

संजय बनसोडे



मिलिंद कुंभारे