ऑक्सिजन ऑक्सिजन

Started by sanjay limbaji bansode, December 02, 2014, 09:39:08 AM

Previous topic - Next topic

sanjay limbaji bansode

हवेत उरला तो
ऑक्सिजनचा गंध आहे
खरा खुरा ऑक्सिजन तर
दवाखान्यात, बाटली बंद आहे
सॄष्टीला हानी पोचवण्याचा
मानवाला जुना छंद आहे
म्हणूनच या भूवरी
ऑक्सिजन आज मंद आहे ! !

बिना झाडाच्या शहराचा
उदय झाला नवा
पेपरा पुरताच उरला लेख
" झाडे लावा झाडे जगवा "
ना करी कुणी आत्मसात
कुणाला पहिजे येथे शुद्ध हवा ! !

लवकरच येइल भारतात
पून्हा एक नवीन स्टाईल
नाकात मास्क घालून फिरू आम्हीं
जग सार आम्हां पाहिल ! !

सरकार बोंबलून बोंबलून थकल
आम्ही मात्र लाज सोडली
शेतकऱ्यानं शेतीसाठी झाडे तोडली
शहरातल्या शहाण्यानी स्वार्थासाठी
सरकारचीच नियम मोडली

असेच राहिले तर होईल ऑक्सिजनचे विसर्जन
देवा जवळ बसून बोलावे लागेल
दे ऑक्सिजन ऑक्सिजन ! !

संजय बनसोडे