प्रेमाची मैफल

Started by eknatha@rediffmail.com, December 22, 2014, 04:54:25 PM

Previous topic - Next topic

eknatha@rediffmail.com

स्वर लहरींवर तरंगत, प्रेम स्पर्शून गेले
गाल चुंबून अलगद,ओठ टेकवून गेले

अर्थ तुझ्या भासाचा सांगून गेले
मधाळ स्वप्न पहाटेचे, सोबत घेवून गेले

रोज नवीन स्वर, रोज नवीन गाणे
थवे पाखरांचे उडवून गेले

मनात कवडसे सोनेरी रुजवून गेले
नकळत पापण्या भिजवून गेले

मैफल पुन्हा अशी सजणार नाही
नशा बेखुदीची चढणार नाही
-रमाकांत