सांग ना… माझी होशील का !

Started by djyashwante, December 25, 2014, 06:37:04 PM

Previous topic - Next topic

djyashwante

सांग ना...
सांग ना...  माझी होशील का ?

पुरे झाला तुझा बहाणा...
प्रेमात तुझ्या झालो दीवाना ...
नयनांची भाषा समजून घे ना,
हृदयाची व्यथा जाणून घे ना ...!

सांग ना...
सांग ना...  माझी होशील का ?

नेहमी तुला बघतो मात्र ...
सांगतात माझे मित्र ...
पाठव तिला प्रेम पत्र,
केव्हा संपणार तुझे हे सत्र ...?

सांग ना...
सांग ना...  माझी होशील का ?

येतेस जेव्हा स्वप्नांत तु...
होतात किती हाल माझे ...
झोपेत बडबडतो मी तेव्हा,
सगळे खडबडून होतात जागे...!

सांग ना...
सांग ना...  माझी होशील का ?

केव्हातरी तु म्हणशील मजला...
तुझीच आहे मी साजणा...
त्या क्षणांची मी वाट पहातो,
केव्हा येशील तु माझ्या अंगणा...!

सांग ना...
सांग ना...  माझी होशील का ?

कवी - दिपक यशवंते "मैत्रेय"

Deepavali

Deepak,

If, "she" were to read your above begging poetry and in response to it, she were to agree to marry you, you would realise within a year after the "blissful" marriage that that your current infatuation with her belonged in fact to a fantasy land. Single people in their twenties commonly reside in a fantasy land just like you.