एक अपघात आणि जन्मलेली माणुसकी ची कथा ....

Started by प्रशांत दादाराव शिंदे, December 26, 2014, 04:07:38 PM

Previous topic - Next topic
तिला उशीर झाला होता . एक पाय दारात ठेवतच आईला हाक मारली "आई मी जात आहे" . आईही "सांभाळून येगं   बाई म्हणाली ."
सकाळी ८ वाजले होते ऑफिस ला जाण्यासाठी सर्वांची धडपड . धावतच स्टेशनला पोहचली ८.१६ मि. ची रोजची ट्रेन पकडण्यासाठी ती उभी राहिली . एका हातात bag आणि एका हातात फोन आणि ट्रेन येई पर्यंत त्यात सुरु होता candy  crush .
रोजच्यासारखे कल्याणला फास्ट लोकलसाठी platform नंबर ७ वर उभी होती .तिने कशीबशी ट्रेन पकडली पण ट्रेन आधीच खचाखच भरून आलेली होती त्यामुळे आज लटकत जावे लागेल ह्याचा तिने अजिबात  विचार केला नाही .तिने ती ट्रेन पकडली आणि एका दोन्ही हाताने   दरवाजा पकडताच गाडी सुरु झाली . तिला आज ऑफिसमध्ये लवकर जायचे होते कारण आज महिन्याचा पगार आणि पगारात वाढ होणार होती , ती आतल्या बायकांना ओरडत राहिली ती आत चला, मावशी आत सरका मी पडेल पण कुणीच ऐकायला मागत नव्हते शेवटी तेच झाले डोंबिवली येण्या आधीच तिचा हात सैल पडला हात सुन्न पडले आणि ती गाडीवर येणारा दगड जसा पुन्हा मागे फेकला जातो तसाच ती ट्रेनखाली पडली . तसेच डब्ब्यात ल्या   बायकांना जाग आली अहो ती मुलगी पडली शेजारील खिडकीतून आवाज आला काय झाले " मुलगी पडली .." हाच आवाज ट्रेनला होता .
पण तिचा हात सुटताना तिला जाणवले आता आपण पडणार आहोत आता मी वाचणार नाही तिने आईला मनोमनीच हाक मारली " आई ..." आणि आईच्याही जीवाचा ठोका वाजला . ती खाली पडली तिच्या अंगभर रक्त होते कुणीच तिच्या मदतीला धावले नाही पण तिथून जाणारा एक फटके कपड्याचा मनुष्य तिथे पडलेल्या प्लास्टिक बाटली वेचत होता आणि त्याला ती मुलगी दिसली . त्याने मागे पाहिले त्याला काहीच सुचत नव्हते त्याने मागे पुढे कसलाही विचार न करता समोरून येणाऱ्या ट्रेन समोर आपल्या मळकट पिशवी सोबत  उभा राहिला आणि ट्रेन थांबली तसेच त्याने त्या मुलीला ट्रेनमध्ये टाकले  अजूनही तिच्यात जीव आहे कि नाही ठाऊक नव्हते ती जगेल कि मरेल  माहित नव्हते तरी तो तिला घेऊन गेला .ती बेशुध्द होती डॉक्टर तिला ICU मध्ये घेऊन गेले तेवढ्यात तिच्या घरच्यांना कुणीतरी कळवले .
तिची आई तिचे बाबा हातातले काम सोडून तसेच धावत रडत तिकडे पोहचले .तिथे   फक्त रडण्याच आक्रोश होता  डॉक्टरांनी सांगितले काही सांगू शकत नाही पण आम्ही प्रयत्न करतो जर ह्या मुलीला येथे पोहचण्यात थोडा वेळ झाला असता तर हि मुलगी कधीच मेली असती . आणि थोड्याच वेळात आतून आवाज येतो सर मुलगी जिवंत आहे .
पण एवढ्यामध्ये ज्या मनुष्याकडे कुणाचेच लक्ष नव्हते ज्याने तिला इथपर्यंत आणले होते .
तो निघणारच तेवढ्यात  आईने त्यांचे पाय धरले आणि त्यांचे आभार मानले  तुम्ही आमच्या मुलीचे प्राण वाचवून आमच्यासाठी देवासारखे धावलात  तेवढ्यात तो व्यक्ती म्हणाला : "  देव मी नाही ताई मी तर माणूसच  पण हो मी माझ्यातला माणूस शिल्लक ठेवलाय तसे आज ह्या दुनियेत ठेवला असता तर तुमची मुलगी काय अजूनही प्राण वाचले असते ...."

ह्या कथेवरून एवढेच सांगायचे आहे कि माणूस कसाही असो मदत करणे हे आपले कर्तव्य आहे कोण गरीब कोण श्रीमंत असे कुणीच नाही मोठी आहे ती फक्त माणुसकी ......

-
लेखक ©प्रशांत डी शिंदे....
दि. २६/१२/२०१४ ....