रॉंग नंबर

Started by डॉ. सतीश अ. कानविंदे, December 27, 2014, 08:02:35 PM

Previous topic - Next topic
रॉंग नंबर

(१९ जानेवारी १९९२ च्या लोकसत्ता 'किशोरकुंज' मध्यें प्रकाशित)

गेल्याच महिन्यात आमच्या घरात
सांगा पाहू आलंय कोण?
अनेक वर्षं तिष्टत ठेवलं
तोच आमचा टेलिफोन

फोन कुणाचा आला तर
छानपैकी वाजते घंटी
रिसीव्हर उचलून घेण्यासाठी
माझ्याआधी धावतो बंटी

"हॅलो, हॅलो" करीत राहतो
बोलत नाही पुढचं काही
ओरडा नाहीतर मारा त्याला
रिसीव्हर कुणाला देतच नाही

शेजा-यांचे नातेवाईक
फोनवरून निरोप देतात
आम्ही जणू काय यांचे नोकर
फुक्कट आमचा वेळ घेतात

असल्या फोनच्या विरोधामध्यें
बंटीने आता कसलीय कंबर
ऎकून घेतो सगळं आणि
शेवटी म्हणतो "रॉंग नंबर"

(मोबाईल फोन्स नव्हते आणि लँडलाईन फोनची सुद्धा बरीच वर्षे प्रतिक्षा करावी लागत असे अशा काळात लिहीलेली ही कविता आहे.)

Ravi Padekar