उध्वस्त झालेली मने कशी बांधावीत??

Started by Radha Phulwade, December 29, 2014, 01:08:22 PM

Previous topic - Next topic

Radha Phulwade

जीवनातील वादळे ही
नैसर्गिक वादळापेक्षाही
महाभयंकर असतात
अशा वादळाने उध्वस्त झालेली
घरे पुन्हा बांधता येतात
परंतु..................
जीवनातील वादळाने
उध्वस्त झालेली मने कशी बांधावीत??

                                  - राधा

कालिंदी

राधा कृष्णावरी भाळली
गुजगुज उठली गोकुळी

अमृतवृक्षी फुलला मोहर
कोकिळकंठी फुटला सुस्वर
कुंजवानातून फुलाफुलांतून
नवलकथा दरवळली

वायूवेगे सुगंध वार्ता
कालिंदीच्या कानी पडता
हरिभक्‍तीची ओढ तियेची
नीलजळी थयथयली

अमरप्रीतिचे गीत लाघवी
हरि अधरीची वेणु वाजवी
राधामोहन बघण्या मीलन
इंद्रपुरी अवतरली