किती सोप्प असत … कोणाला टाळण …. !

Started by AKSHAY BHALGAT, December 30, 2014, 08:08:43 AM

Previous topic - Next topic

AKSHAY BHALGAT

किती सोप्प असत , कोणाला टाळण ।

कितीही सांगितलं या मनाला तरीही ., ऐकत नाही ,

आज परत एक गैर समज दूर झाला .............

"एक"-मेकांना समजून घेताना , कधीच वाटल नाही कि ,
शेवटी तो "एक" मीच आहे ... जो समजून घेतो...

वाटायचं कि , आपल्याला कोणीतरी ऐकेल , अस मिळालं ।
समजून घेईन ,
चुकत असेल तर सांगेन ,

पण हसायला येत असत , स्वतःवरच ... आणि नंतर , सगळ झाल्यावर ....

किती सोप्प असत , कोणाला टाळण । १)

मन मानत नाहीये ..., कि अजूनही "ती" जातीये ...
एका अशा ठिकाणी कि , परत कधीच , चुकूनही या वाटेकडे बघताना ....
तिला " हि वाट" मोकळी नजर असावी , अस वाटेल ... !

आणि एक वेळ अशी हि होती कि ,
एकट रस्त्याने चालताना सुद्धा , तिला ...
मी सोबत असल्यासारख वाटायचं ... खरंच ....!

किती सोप्प असत , कोणाला टाळण । २)

आजही बोलताना वाटत तिला सांगाव,
कि .... चांगल आहे विसरलीस ते  ;

कि परत त्याच  FEELINGS  , ज्या आधीही
या समाजाकडून मिळत राहिल्या , त्या तुझ्यामुळे सतत या जिवाला
हेच आठवण करून देतात कि , खरंच .... !

किती सोप्प असत , कोणाला टाळण । ३)

पण एक वेळ अशीही येईल कि ,
तुला हेच वाटावे ...,

खरच ; आज मी असतो अजुनहि ,

तर तुला समजावू शकलो असतो ,
ऐकू शकलो असतो ,

पण , .... पण "ती वेळ" शेवटची असेल ।

कारण , या शरीरातून , या मनातून ....
तेच भाव ... तुझ्या पर्यंत पोहोचायला , त्या FEELINGS ,
त्या भावना , माझ्यात  उरल्या नसतील ... !

आणि त्या वेळी , तुही हेच म्हणशील कि....

" अक्षय "   खरंच ...,

किती सोप्प असत , कोणाला टाळण । ४)


अक्षय भळगट