31 dec 2014

Started by swara, December 31, 2014, 11:49:20 PM

Previous topic - Next topic

swara

३१ dec २०१४
             
       कालचा संपूर्ण दिवस त्याचीच आठवण येत होती. डोळ्यातले पाण्याचे थेंब गालावरून घसरून हातावर सांडत होते . उगाचच अस कोण रडत का ? whats app  वर ग्रुप chat चे msg नुसतेच बघत होती. mobile बाजूला ठेऊन डोळे बंद केले आणि झोपून गेली. एखादी गोष्ट इतकी मनाला का लागते ? ३० dec अगदीच वाईट दिवस होता अस म्हणायला हरकत नाही.................  अस काही घडत असताना एकदम छानशी गोष्ट घडली तर कस वाटेल ?  छान वेगेरे काहीच घडणार नाही हे माहित होत.  :D :D

      आज दिवसभर घरी राहून खूप कंटाळा आला अस म्हणून मी TV लावला. ४-५ channels change करून पुन्हा TV बंद केला. घडाळ्यात ७:२० झाले होते. सुट्टीमध्ये रणजीत देसाई यांच श्रीमान योगी वाचण्यात वेळ जात होता, म्हणून ते वाचायला घेणार तेवढ्यात माझा MOBILE वाजला. त्याने या २ वर्षात एकदाही CALL नव्हता केला. Mr invisible calling ............... त्याच नाव अस काहीस save केल होत. मी थोडा वेळ तशीच राहून पुन्हा चेक केल... तो त्याचाच call होता. आजच्या दिवशी त्याचा call येइल याची जराही कल्पना नव्हती. वर्षाच्या शेवटचा दिवस इतका awesome जाईल वाटल नव्हत.  call var  खूप सारया नाही पण छोट्या छोट्या गोष्टी त्या ५-१० मिनिटात बोललो. उद्या तो मला भेटणार ............. २०१५ ची सुरुवात आपल्या प्रीयजनांसोबत व्हावी अस आपल्या सगळ्यांनाच वाटत...  :)

पुन्हा पुन्हा तीच वाट
तीच लाट जणू ,
अंगावरून सरसावते
ती नाजूक पाहट

अंधारलेल्या वाटेवर
तुझी हरवलेली साथ
बंद डोळ्यानेही आठवेल
त्या समुद्राचा काठ ............ 

कवि - विजय सुर्यवंशी.

सुरेख...........
.
.
.
पुन्हा आपली नव्याने ओळख,
आपण नव्याने भेटल्यावर....
अन जुन्या आठवणी पुसुन गेल्या,
ओल्या पापण्या मिटल्यावर....
.
.
.

swara

vijay sir tumch likhaan apratim aahe  :)

कवि - विजय सुर्यवंशी.

धन्यवाद स्वरा...