झालो जर श्वास तुझा...

Started by djyashwante, January 02, 2015, 03:05:26 PM

Previous topic - Next topic

djyashwante

झालो जर श्वास तुझा...
ठाव मनाचा घेईन मी,
आवडले मज मन तुझे जर...
तिथेच नेहमी राहीन मी !

घे सामाऊन श्वासामध्ये...
अंत:करणात जाऊ दे,
कोण दडलंय हृदयात तुझ्या...
निरखून जरा पाहू दे !

असीम तुझे सौंदर्य जसे...
मनही सुंदर असेल का ?
तीच माझ्या कल्पनेतील...
छबी मला दिसेल का !

अबोल अशी प्रीत सखे...
सांग तुला कळेल ना ?
भाव दिसतील नयनांतुनी,
ज्योत प्रेमाची जळेल ना !

कवी- दिपक यशवंते "मैत्रेय"


Prafull Chandrakant Joshi

ज्योत प्रेमाची जळल्यावर
माझ्या प्रेमाची किम्मत तुला कळेल ना
दूर मला सोडून तू परत कधी जाणार नाही ना

Prafull Chandrakant Joshi

ज्योत प्रेमाची जळल्यावर
माझ्या प्रेमाची किम्मत तुला कळेल ना?
दूर मला सोडून तू परत कधी जाणार नाही ना?
दूर जर तू गेली तर जिव माझा जळेल ग!
तुझ्या शिवाय जगताना पावलो पावली मी मरेल ग!
मरता मरता सांग सखे जवळ मला तू घेशील का?
तुझ्या त्या आठवणीत नंतर मला तू आठवशील का?

rjtao

jyot premachi jalalyawar
tewat ti thewashil na
aart haak hi ya jiwachi
sakhe evadhi ekshil na