स्वप्न सरी ....

Started by durga, January 05, 2015, 03:47:24 PM

Previous topic - Next topic

durga

प्रितिचे ढग दाटुन येतात
मनाला दूर वाहुनि नेतात
पावसाळी ऋतुचा सोहळा थेंबातून गातात
चिंब पावसाची अल्लड गाणी
माझ्या मनात देतात
सर येते माझ्या मनाच्या मातीला
नवा गंध देते

धुंध होउनि मग मनी प्रेम अंकुर अंकुरतो
जीव हरखुनि जातो
स्वप्नाचा मग पाऊस पडतो
त्यात मन ओल चिंब होत
स्वप्नाना ही मग पाखराचे पंख लागतात
हे माझे स्वपन मग प्रेमळ आकाशाला
एक ओलसर रंग देतात
तेव्हा मात्र माझे प्रेमाचे
शब्द् भिजुनी जातात
अन् अर्थ त्या थेंबालाही येतात।
अन् अर्थ त्या थेंबालाही येतात ।
त्याच थेंबात मला वाहुनि नेतात ।

       दुर्गा वाड़ीकर्


durga wadikar