असच असतं प्रेम

Started by Vedanti, January 10, 2015, 11:27:09 PM

Previous topic - Next topic

Vedanti

सुखमय जीवनासाठी आवश्यक असतं , ते प्रेम...
प्रफुल्लित असण्यासाठी उपकारक असतं , ते प्रेम...

प्रेम तर विश्वातील कणाकणांवर करायचं असतं...
आयुष्य देणार् या विधात्यावर करायचं असतं...

जन्मदाते आई-वडिलांवर करायचं असतं...
वेळोवेळी साथ देणार् या मैत्रीवर करायच असतं...

ते कधी मनाला प्रसन्न करून ओठांवर हसू आणणारं असतं...
तर कधी हृदयाला स्पर्श करून आनंदाश्रु आणणारं असतं...

प्रेम हे असच असतं;
जितकं दिलं त्यापेक्षा अधिक मिळत असतं...

म्हणूनच
ठेवायची असते मनात प्रेमभावना
कारण 
व्यर्थच आहे हे जीवन प्रेमाविना...


वेदांती आगळे 
[url="http://vedantiagale.blogspot.com/"]Vedanti Agale Blogspot[/url]

कवि - विजय सुर्यवंशी.

#1
अतिशय सर्वांगसुंदर प्रयत्न.............
.
.
.
छान लिहली आहे कविता...   

Vedanti

#2
धन्यवाद  :)
[url="http://vedantiagale.blogspot.com/"]Vedanti Agale Blogspot[/url]