दूरावा

Started by गणेश म. तायडे, January 24, 2015, 03:39:53 PM

Previous topic - Next topic

गणेश म. तायडे

सोडूनी दूर तुला,
प्राण माझा हरवूनी गेला...
हरवल्या तुझ्या पायवाटा,
एकट्या सोडूनीया गेल्या...
सोडूनीया साथ माझी,
करून गेली असाह्य...
गुदमरलेल्या भावनांची,
ही कसली दाह...
नको असला प्राण,
ज्यात श्वास तुझा नाही...
नको असला श्वास,
ज्यात तु दरवळत नाही...
भरती ही कसली,
आसवांची नयनसागरी...
माझी नजरे शोधती,
तुला कावरी बावरी...
धगधगत्या या पाण्याला,
ही कसली आग लागली...
दृष्ट माझ्या प्रेमाला,
कुणाची अशी लागली...
स्वप़्न सारी माझी,
क्षणात विखरून गेली...
काळजाचा ठोका,
चुकवूनी गेली...
होती नव्हती आठवण,
ती पण आता सरली...
न मरण्याची चिंता,
न जगण्याची आशा उरली...

- गणेश म. तायडे
   खामगांव
  ganesh.tayade1111@gmail.com