खरे शिवाजी

Started by sanjay limbaji bansode, January 25, 2015, 03:05:56 PM

Previous topic - Next topic

sanjay limbaji bansode

हि कविता .
राष्ट्रमाता जिजाऊ साहेब यांचे वंशज
इतिहासकार प्रा. नामदेवराव जाधव यांना समर्पित


माँ जिजाऊचे खरे वंशज तुम्ही
आम्हास आता उमजले !
शिवरायाचे खरे कार्य
तुम्हां मुळेच जगी समजले ! !

दुष्ट इतिहासकार
घालती राजावरती आळ
सांगत होते खोटे जगी
राजे मुस्लिमांचा कर्दनकाळ !
राजे नव्हते जातीवादी
हे तुम्हीच जगी सांगितले !
शिवरायाचे खरे कार्य
तुम्हामुळेच जगी समजले ! !

जात पात न बघणारे
राजे होते छत्रपती
सर्वाना समान राबीवणारे
राजात होती मात्रुभक्ती !
फक्त हिंदूच मज हवा मावळा
ना राजे कधी वदले !
शिवरायाचे खरे कार्य
तुम्हांमुळेच जगी समजले ! !

अठरा पगड जातीचा
राजांना होता लळा
एक करून सर्वाना
स्वराज्यात नाव त्यांचे मावळा !
तुमच्या मुळेच या जगी
खरे छत्रपती दिसले !
शिवरायाचे खरे कार्य
तुम्हामुळेच जगी समजले ! !


" जय जिजाऊ"
" जय शिवराय "


संजय बनसोडे