देशद्रोही

Started by गणेश म. तायडे, January 29, 2015, 08:43:12 PM

Previous topic - Next topic

गणेश म. तायडे

शोधतो वाट मी
दुरवर गेल्या स्वजनांची,
मानव जातीच्या समुहात
माणूस नावाच्या प्राण्याची...

स्वार्थ बुद्धीचे आहेत सारे
करताहेत भ्रष्टाचार,
म्हणतो आमचे थोर विचार
दळवून बसलेत शिष्टाचार...

भाषा क्रांतीच्या बंडाची
नाही मुळीच उरली,
पेटली धग मात्र
आतंकवादात निर्दावली...

मंचकावर उभे राहूनी
हे देती फक्त भाषण,
शिकून सवरून आम्ही मात्र
आजही फोडतो पाषाण...

झुंगारलेले अस्तित्व महात्म्यांनी
देशद्रोही पुन्हा अर्पित आहे,
पुढारकीच्या सहवासात मात्र
भ्रष्टाचार डोकावत आहे...

लाच देवूनी स्वस्वार्थासाठी
बजावतात हे अधिकार,
पदवी मिळवुनही इथे
पदवीधर आहेत बेरोजगार...

सत्तेसाठी सदविवेक बुद्धीला
सदा गारद त्यांनी केले,
पैसा मिळवण्यासाठी वाट्टेल ते
भ्रष्टाचार चालविले...

जिवंत मुडद्यांच्या गर्दीत
अमाणूषतेचे रक्त भिनले,
व्यभिचाराचा वारा प्राषुण
माणसाला उध्वस्त केले...

- गणेश म. तायडे
   खामगांव
  ganesh.tayade1111@gmail.com